चिपळूणमधील विकासकामांची उद्या भूमीपूजन
चिपळुणातील विकासकामांचे उद्या भूमीपूजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः चिपळूण नगरपालिकेतर्फे जिल्हास्तर नगरोत्थान योजना, विशेष रस्ता अनुदान, मागासवर्गीय कल्याण समिती व नगर परिषद निधीअंतर्गत विकासकामांचे भूमीपूजन सोहळा २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमीपूजन होणार असून, राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री योगेश कदम यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हास्तर नगरोत्थान योजना २०२४-२५ अंतर्गत खंड मापारी मोहल्ला, खंड बडदेवाडी तसेच देसाई मोहल्ला परिसरात आरसीसी गटार व संरक्षक भिंतींची बांधकामे करण्यात येणार आहेत. तसेच विशेष रस्ता अनुदान २०२३-२४ अंतर्गत पेठमाप रोड परिसरात विविध ठिकाणी आरसीसी गटारांची बांधकामे प्रस्तावित आहेत. मागासवर्गीय कल्याण समिती २०२५-२६ अंतर्गत प्रांत कार्यालयाशेजारी राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या निधीतून पागमळा भागातील शिंदेमळा ते परांजपे स्कीम गेटपर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला लोकसभा व विधानपरिषदेचे सदस्य, आमदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चिपळूण नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्षा रूपाली दांडेकर, नगरसेवक-नगरसेविका आदी उपस्थित राहणार आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

