चिपळूण ःजल्लोषात साजरा होणार शिमगोत्सव
ratchl२४२.jpg
26891
चिपळूण ः टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई.
----------
टेरवमध्ये ३ मार्चपासून जल्लोषात
साजरा होणार शिमगोत्सव
चिपळूण, ता. २४ ः तालुक्यातील टेरव येथील कुलस्वामिनी श्री भवानी-वाघजाई या जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात व धार्मिक वातावरणात ३ मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, पुजारी व ग्रामस्थ हे उत्सवाची जय्यत तयारी करत आहेत.
श्री भवानी-वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ व गवत इत्यादीने सजवलेल्या होमाची पुजारी पारंपरिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते पहाटे यथासांग विधीवत पूजा करून घेतील. गावचे पुजारी (गुरव) चांदीने मढविलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांच्या रूपी लावून मंदिर व होमासमोरील मानाच्या सहाणेवर बसतील.
खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे वेध लागण्यापूर्वी ढोलताशांच्या गजरात होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम पहाटे ५.३० वा. प्रज्वलित करून ग्रामस्थ होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण करतील. प्रदक्षिणा घालताना
भैरी-केदाराच्या नावानं चांगभलं असे म्हणत पालखी नाचवत उंचावून उपस्थित भाविकांना दर्शन दिले जाईल. ग्रहण असल्यामुळे पालखी मंदिरात सकाळी ६.२० वा. स्थानापन्न करून मंदिर दर्शनासाठी संध्याकाळी ६.४५ पर्यंत बंद ठेवण्यात येईल.
ग्रहण काळ संपल्यावर मंदिराची साफसफाई, शुद्धीकरण व देवतांचे अभिषेक करून रात्री ८ नंतर परंपरेप्रमाणे पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात येईल.
लिंगेश्वर वाडीतून पालखीचा छबिना काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजतगाजत मध्यरात्री मंदिरात आणली जाईल. ४ ते १४ मार्च या कालावधीत पालखी रूढी-परंपरेनुसार घरोघरी नेण्यात येईल. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजतगाजत वाडीवाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ होईल. रात्री ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी (सेवेसाठी) उपस्थित राहतील. या कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधव पालखीसोबत ताशा वाजावतील, अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या शिमगोत्सवाची सांगतारूपी भंडारून करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

