जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षा उत्साहात
जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षा उत्साहात
१३ हजार ८१९ विद्यार्थ्यांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यात अत्यंत सुरळीत आणि शांततेत झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात परीक्षा केंद्रांवर हजेरी लावली होती.
यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण १३ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ८१९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली तर १४९ विद्यार्थी विविध कारणांमुळे परीक्षेला गैरहजर राहिले. पाचवीसाठी सर्वाधिक ९ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आठवीच्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४ हजार ३४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. ग्रामीण तसेच शहरी भागातील केंद्रांवर सकाळपासूनच विद्यार्थ्यांची आणि पालकांची मोठी लगबग पाहायला मिळाली.
परीक्षा केंद्रावर चोख नियोजन जिल्हा प्रशासनाच्या आणि शिक्षण विभागाच्यावतीने परीक्षेसाठी चोख नियोजन करण्यात आले होते. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती. केंद्रांवर पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. बहुतांश केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडल्याने शिक्षण विभागाने समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

