कुडाळ येथे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

कुडाळ येथे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

Published on

कुडाळ येथे महिलांसाठी
विविध स्पर्धांचे आयोजन
कुडाळ : सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळ, कुडाळ यांच्या वतीने यंदाही महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. समाजातील जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भगिनी मंडळाने केले आहे. पाककला स्पर्धा पाच मार्चला दुपारी तीन वाजता होईल. विषय ‘पनीर व्हेजिटेरियन-कोणतीही एक डिश’ असा आहे. याच दिवशी सायंकाळी चार वाजता फनी गेम्स असून नोंदणीसाठी डॉ. दीपाली काजरेकर यांच्याशी संपर्क साधावा. वेशभूषा स्पर्धा ८ मार्चला दुपारी ३ वाजता असून ऐतिहासिक, सामाजिक किंवा पौराणिक व्यक्तिरेखा असा विषय आहे. या स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या १० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल. याच दिवशी ग्रुप डान्स सायंकाळी ४ वाजता असून या स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या ५ ग्रुपना प्राधान्य दिले जाईल. नोंदणीसाठी अदिती सावंत यांच्याशी संपर्क करावा. कार्यक्रम मराठा समाज हॉल येथे होतील, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा डॉ. दीपाली काजरेकर यांनी केले.
...................
‘कृषी पुरस्कारांसाठी
अर्ज सादर करा’
सिंधुदुर्गनगरीः महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानित केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिली आहे. इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट यांनी २०२५ पासूनचे विविध कृषी पुरस्कारांबाबतचे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावेत. इच्छुक शेतकऱ्यांनी तत्काळ आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करावा, असे आवाहन कृषी आयुक्त यांनी केले आहे.
....................
ओरोस आयटीआयमध्ये
निदेशक पदांसाठी भरती
सिंधुदुर्गनगरीः पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोसमध्ये रिक्त असलेल्या गणित व चित्रकला निदेशक पदांवर तात्पुरत्या स्वरुपात घड्याळी तासिका तत्वावर निदेशक भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य यांनी केले आहे. या रिक्त पदे व आवश्यक शैक्षणिक अर्हता शासनाच्या महास्वयंम पोर्टल देण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी महास्वयंम पोर्टलवर अर्ज करावेत किंवा पद्मश्री रमाकांत आचरेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षक संस्था आरोस येथे दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत टपालाने किंवा हस्तदेय सादर करावेत. अर्ज भरलेल्या किंवा अर्ज हस्तदेय सादर केलेल्या उमेदवारांनी ४ मार्चला सकाळी ११ वाजता सर्व शैक्षणिक व आवश्यक अहर्तच्या मूळ कागदपत्रे व झेरॉक्सप्रतींसह उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता संपर्क साधावा, असे आवाहन ओरोस शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य, यांनी केले आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com