सागरी महामार्गाची दुरुस्ती मार्चपासून
26910
सागरी महामार्गाची दुरुस्ती मार्चपासून
म्हापणमधील काम; बांधकाम विभागाची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २४ : येथून जाणाऱ्या सागरी महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. हे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी दिली.
म्हापण गावातून रेडी-रेवस महामार्ग जात असून, या महामार्गावरील म्हापण बाजारपेठ ते वेंगुर्ले दरम्यानचा रस्ता मागील दोन वर्षांपासून नादुरुस्त झाला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे त्रासदायक व धोकादायक बनले आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, यासाठी म्हापण जिल्हा परिषद सदस्या यज्ञा साळगावकर, म्हापण पंचायत समिती सदस्य विष्णू उर्फ आप्पा फणसेकर, शिवसेना विभागप्रमुख देवदत्त साळगावकर आणि आबा कोचरेकर यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता इंगवले यांची भेट घेतली. यावेळी रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात सविस्तर चर्चा करून, लवकरात लवकर काम सुरू व्हावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सविस्तर चर्चेनंतर, मार्चच्या पहिल्या आठवड्यात रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता यांनी दिले. पालकमंत्री नीतेश राणे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष पाठपुराव्यातून या रस्त्याचे काम मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

