राजापुरात १ मार्चला स्वच्छतेचा जागर

राजापुरात १ मार्चला स्वच्छतेचा जागर

Published on

rat24p9.jpg
26912
राजापूर : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारही प्रतिष्ठानच्यावतीने नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांना निवेदन देताना श्री सदस्य.
---------

राजापुरात १ मार्चला स्वच्छतेचा जागर
श्री सदस्यांचा पुढाकार; नगरपालिकेला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने १ मार्चला राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचा जागर होणार आहे. धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमामध्ये राजापूर आणि लांजा तालुक्यातील शेकडो श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
प्रतिष्ठानच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानासंबंधित श्री सदस्यांनी आज नगराध्यक्ष अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांना निवेदन दिले. या वेळी चर्चा करताना या अभियानाला राजापूर नगरपालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांनी आश्‍वासित केले. या वेळी उपनगराध्यक्ष विनय गुरव, विरोधी गटनेते अ‍ॅड. राहुल तांबे, मुख्याधिकारी अभिजित कुंभार आदी उपस्थित होते.
या अभियानामध्ये वैशंपायन पूल, बागकाझीमार्गे ओगलेवाडी रस्ता ते गोठण मैदान, साखळकरवाडी होळीमांड, मैदान रस्ता ते लक्ष्मीनारायण मंदिर वा पाण्याची तळी परिसर, कोंढेतड चव्हाटा रस्ता ते गांगोमंदिर परिसर, कोंढेतड, तळी, कोंढेतड चव्हाटा ते कोंढेतड गणेशघाट, स्टेट बँक राजापूर रस्ता ते ठाकूर बेकरी रस्ता, एसटी डेपोपासून घुमे घर बंगलवाडी रस्ता ते बावकर हॉस्पिटल, मुन्शी नाका ते महापुरुष वरचीपेठ रस्ता, शासकीय विश्रामगृह रस्ता ते म्हसोबा देवस्थान शीळ, निनादेवी मंदिर ते साईमंदिर रस्ता व नगरपालिका गार्डन परिसर, भारत गॅस कार्यालय रस्ता ते साईनगर कोदवलीअंतर्गत रस्ते, राजापूर एसटी डेपो वर्कशॉप कार्यालय परिसर, स्टार प्लाझा ते गुरववाडी महापुरुष कोदवली रस्ता, राजापूर एसटी शेड व नदीपात्र या परिसराची स्वच्छता केली जाणार आहे. या सेवेसाठी भालावली, गावडे आंबेरे, नाटे, नाणार, सागवे, खारेपाटण, कोदवली, केळवली, राजापूर, लांजा, दोनिवडे, बाकाळे येथील श्रीसमर्थ बैठकीतील सदस्य सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com