सावंतवाडी विद्यासेवक पतपेढी तालुका अध्यक्षपदी काकतकर
26937
सावंतवाडी विद्यासेवक पतपेढी
तालुका अध्यक्षपदी काकतकर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यासेवक पतपेढी सावंतवाडीच्या अध्यक्षपदी सोनुर्ली हायस्कूलचे शिक्षक पांडुरंग काकतकर यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी गोविंद कानसे यांची बिनविरोध निवड झाली.
संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची सभा येथील पतसंस्था कार्यालयात आज राजन आरावंदेकर (अध्यासी अधिकारी, अधीन सावंतवाडी उपनिबंधक कार्यालय) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी काकतकर यांची तर उपाध्यक्षपदी कानसे यांची निवड करण्यात आली. या सभेला संस्थेचे संचालक तथा माजी अध्यक्ष पवन वणवे, जयवंत पाटील, संचालक तथा माजी उपाध्यक्ष शरद जाधव, हर्षाली खानविलकर, संचालक विठ्ठल सावंत, राजेश गुडेकर, हंबीरराव अडकुरकर, अनुष्का गावडे, संस्था सचिव आराध्या पेंडूरकर, वराडकर उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे समृद्धी पॅनलचे मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष ओमप्रकाश तिवरेकर, शिक्षक भारतीचे जिल्हा सचिव तथा जिल्हा पतपेढीचे अध्यक्ष समीर परब, कार्याध्यक्ष तथा जिल्हा पतपेढीचे संचालक प्रदीप सावंत, शिक्षकेतर कर्मचारी राज्य संघटनेचे पदाधिकारी वैभव केंकरे, अनिल जाधव, भिवा धुरी, शिक्षक नितीन गवंडळकर, संतोष वैज यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

