बावळाट येथे आज सातेरी वर्धापन दिन

बावळाट येथे आज सातेरी वर्धापन दिन

Published on

swt2415.jpg
26927
श्री सातेरी माऊली

बावळाट येथे आज
सातेरी वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २४ ः बावळाट गावचे ग्रामदेवत श्री देवी सातेरी माऊली पंचायतनाचा ३३ वा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. २५) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ९.३० वाजता अभिषेक, पूजा, ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता महिलांच्या फुगड्या, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ११.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी तसेच बावळाट ग्रामस्थांनी केले आहे.
................

Marathi News Esakal
www.esakal.com