रहाटे यांचा सन्मान
-rat२४p१०/jpg-
२६O२६९६१
मुंबई ः भारतीय विद्यापीठातर्फे सन्मान स्वीकारताना विलास रहाटे.
------
भारतीय विद्यापीठाकडून
विलास रहाटेंचा सन्मान
साखरपा, ता. २५ : देवरूख येथील जागतिक कीर्तीचे रांगोळीकार विलास रहाटे यांचा भारतीय विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला. रांगोळी आणि कलाक्षेत्रातील रहाटे यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शारीरिक शिक्षण विभागातर्फे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला रांगोळीत विश्वविक्रम करणारे रांगोळीकार विलास रहाटे उपस्थित होते. या वेळी रांगोळी कलाक्षेत्रात केलेल्या योगदानाविषयी रहाटे यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरी येथे हा समारंभ झाला.

