पान एक-अवकाळी पाठोपाठ दाट धुक्याचे सावट

पान एक-अवकाळी पाठोपाठ दाट धुक्याचे सावट

Published on

swt2429.txt
टीप : swt2425.jpg मध्ये फोटो आहे.

वैभववाडी ः जिल्ह्यात आज सर्वत्र प्रचंड धुके पाहायला मिळाले.

अवकाळीपाठोपाठ
दाट धुक्याचे सावट

आंबा, काजूवर संकट; तापमानातही वाढ

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २४ ः जिल्ह्याच्या काही भागात दोन दिवस अवकाळी पाऊस झाल्यानंतर आज जिल्ह्यात सर्वत्र प्रचंड धुके पसरले होते. या धुक्याचा मोठा परिणाम आंबा, काजूवर होणार आहे. अगोदरच मोहोर करपला असून, धुक्यामुळे उरलासुरला मोहोरही करपण्याची भीती बागायतदारांमध्ये आहे.
जिल्ह्याच्या वातावरणात शनिवारी (ता. २१) सायंकाळपासून बदल जाणवायला सुरुवात झाली. रविवारी (ता. २२) जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. त्यानंतर सोमवारी (ता. २३) पहाटेपासून जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसानंतर आज पहाटेपासून दाट धुके सर्वत्र पसरले असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाप्रमाणे धुक्याचे पाणी पडत असल्याने उरल्यासुरल्या आंबा, काजू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार हवालदिल झाले आहेत. दरम्यान, गेले तीन-चार दिवस तापमानातही मोठी वाढ झाल्यामुळे बागायतदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com