कुरतडेतील वणव्यात ६० लाखाचे नुकसान
-rat२४p१२.jpg, rat२४p१३.jpg-
P२६O२६९९१
रत्नागिरी ः कुरतडे येथील वणव्यात आंबा व काजू कलमे खाक झाली.
------
कुरतडेतील वणव्यात ६० लाखांचे नुकसान
आंबा, काजूची ३०० कलमे खाक ; चार बागायतदारांना फटका
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २४ ः रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे गावातील धानभाटले या भागात लागलेल्या मोठ्या वणव्यात चार बागायतदारांचे ५५ ते ६० लाखांचे नुकसान झाले. काजूच्या बागा पूर्ण जळून खाक झाल्या. तीन वर्षाची लागवड केलेली सुमारे ३०० कलमे जळून खाक झाली. ही आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गावातील ग्रामस्थांना दुरून धूर आल्याचे दिसल्याने आग लागल्याचे समजले. ते पाहून ग्रामस्थ आग नियंत्रणात आणण्यासाठी धावले; परंतु पाचजणांच्या बागा जळून यामध्ये खाक झाल्या.
या आगीमध्ये सत्यवान यशवंत रहाटे, शुभम विवेक गांगण, विकास पाथरे, चंद्रकांत दिनकर पोवार यांच्या आंबाबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या सर्वांचे सुमारे ५५ ते ६० लाखांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा तलाठी, सरपंच, कृषी विभागाने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

