-पंचनदीमध्ये दिवसा घरफोडी, ७ लाखाचा ऐवज लंपास
पंचनदीमध्ये भरदिवसा घरफोडी
सोन्याच्या दागिन्यांसह सात लाखांच्या ऐवजावर डल्ला
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २४ : तालुक्यातील दाभोळ परिसरातील पंचनदी कुणबीवाडी येथे भरदिवसा चोरट्याने घर फोडून तब्बल ७ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी घर बंद असतानाच मागील दरवाजा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. मौजे पंचनदी कुणबीवाडी येथे २२ फेब्रुवारीला दुपारी १२ ते सायंकाळी ७ च्या सुमारास ही चोरी झाली. या प्रकरणी मानसी महेंद्र नाचरे (वय ३७, रा. पंचनदी कुणबीवाडी) यांनी दापोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, चोरट्याने नाचरे यांच्या घराचा मागील दरवाजा जोरात ढकलून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट हत्याराने उघडून कपाटातील तिजोरी फोडली. तिजोरीत स्टीलच्या किटलीत व प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये दोन सोन्याचे मंगळसूत्र (११ ग्रॅम प्रत्येकी), कानातील सोन्याच्या कड्या, कानपट्टी चेन, लेडीज अंगठी, नथ, जेन्ट्स अंगठ्या व चेन तसेच लॉकेट असलेली १५ ग्रॅम वजनाची चेन यांचा समावेश आहे. तसेच ५०० रुपयांच्या १० नोटा असा एकूण पाच हजार रुपयांचा रोख रकमेचाही समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

