ओणीत दोन ट्रकच्या अपघातात एकजण ठार
-rat२४p१५.jpg-
P२६O२७००९
राजापूर ः ओणी येथील अपघातातील दोन वाहने.
----
ओणीतील अपघातात ट्रक चालक ठार
उभ्या ट्रकला जोराची धडक; मृत कर्नाटकातील
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील ओणी तिवंदामाळ येथे आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये ट्रकचालक ठार झाला. महम्मद रिझवान अब्दुल करीम ( वय २८, रा. मंगलोर, कर्नाटक) असे चालकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महम्मद रिजवान अब्दुल करीम हा ट्रक घेऊन गोव्याकडून मुंबईच्या दिशेने चालला होता. सकाळी १०.४५ वा. च्या सुमारास ओणी-तिवंदमाळ येथे राजस्थानी धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात आढळला. त्यामध्ये भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचालकाला जबरदस्त मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर राजापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मृत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधील चालक सुदैवाने बचावला. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एम. एम. शेख तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

