रत्नागिरीत कार्यक्रम

रत्नागिरीत कार्यक्रम

Published on

rat२५p११.jpg-
२६O२७०७३
रत्नागिरी : गोदुताई जांभेकर विद्यालयात श्री गुरू तेग बहाद्दूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सक्षम मोसमकर. सोबत संजना तारी व शिक्षक
----
गुरू तेग बहाद्दूर यांचे स्मरण
जांभेकर विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन ; माहितीपट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात सोमवार (ता. २३) ‘हिंद की चादर’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजना तारी या होत्या.
प्रशालेतील विद्यार्थी सक्षम मोसमकर याने ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहाद्दूर यांच्या महान कार्याविषयी माहितीपूर्ण भाषण केले. त्यांनी गुरू तेग बहाद्दूर यांनी धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान, त्यांचे शौर्य, त्याग आणि मानवतेसाठी केलेले कार्य यावर प्रकाश टाकला. त्यांच्या विचारांनी समाजात समानता, सहिष्णुता आणि धैर्याची प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांना गुरू तेग बहाद्दूर यांच्या जीवनकार्याची अधिक सखोल माहिती मिळावी यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आला. या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची आणि योगदानाची स्पष्ट व प्रभावी ओळख झाली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका संजना तारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com