गडनदी परिसरात ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’
27082
कणकवली : शहरातील गड नदीपात्रालगत स्वच्छता करताना निरंकारी मंडळाचे सदस्य.
गड नदी परिसरात ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’
कणकवलीतील मोहीम; ‘संत निरंकारी’, नगरपंचायतीचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २५ : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि कणकवली नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’ ‘प्रोजेक्ट अमृत’ उपक्रमांतर्गत शहरातील गड नदीपात्रालगतच्या कनकनगर येथील गणपती साना ते केटी बंधारा परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत कनकनगर प्रभागाचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सुमारे ८० सेवादल स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करत केटी बंधाऱ्यावरील नदीपात्रातील कचरा बाहेर काढला. या स्वच्छता उपक्रमात कनकनगर परिसरातील रहिवाशांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
परिसर स्वच्छ झाल्याने कनकनगरवासीयांनी समाधान व्यक्त केले. सुशांत नाईक यांनी ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’ या उपक्रमाचे, तसेच सहभागी सर्व सेवादलाचे कौतुक करत नागरिकांना आपला प्रभाग कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, केटी बंधारा परिसरात काही व्यक्तींकडून मद्यपान व नशा केल्याचे प्रकार आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा गैरकृत्यांमुळे परिसर अस्वच्छ होत असल्याने पुढे अशा प्रकारात कोणी आढळल्यास नगरपंचायतीच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे संयोजक विलास जाधव, संचालक महेश पांचाळ, कनकनगरवासीय उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

