सातत्याने स्पर्धांमध्ये सहभागी व्हा
O27083
सातत्याने स्पर्धांमध्ये सहभागी व्हा
डॉ.राजेंद्र मुंबरकर : कणकवली कॉलेजमध्ये ‘केम फेस्ट’ चर्चासत्र
कणकवली, ता. २५ : विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सृजनशीलता वाढवण्यासाठी तसेच टीमवर्क आणि कम्युनिकेशन स्किल्स विकसित करण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे. अशा स्पर्धांकडे केवळ परीक्षेच्या चौकटीत न पाहता परीक्षेपलीकडील शिक्षण म्हणून पाहिले पाहिजे, असे आवाहन कणकवली कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.
स. ह. केळकर महाविद्यालय आणि कणकवली कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘केम फेस्ट’ या जिल्हास्तरीय सेमिनार स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.मुंबरकर बोलत होते. यावेळी कणकवली अभियांत्रिकी कॉलेजचे प्रा.डॉ. महेश साटम, केळकर कॉलेजचे डॉ. सी. डी. भेंकी, तसेच कणकवली महाविद्यालयाचे डॉ. शामराव डिसले उपस्थित होते.
स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, संत राऊळ महाराज महाविद्यालय, स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड आणि कणकवली कॉलेजचे रसायनशास्त्र विषयाचे पदवीधर विद्यार्थी सहभागी झाले होते. एकूण आठ गटांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. तर विद्यार्थ्यांनी हरित रसायनशास्त्र, नॅनो रसायनशास्त्र, पर्यावरणीय रसायनशास्त्र, औषधनिर्मिती रसायनशास्त्र, पॉलिमर रसायनशास्त्र आणि दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र या विषयावर सात मिनिटांचे सादरीकरण केले. प्रा. हेमंत गावित यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अविनाश पोरे यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी कणकवली महाविद्यालयाचे युवराज महालिंगे, स. ह. केळकर महाविद्यालयाचे प्राचार्य कुन्नुरे, उपप्राचार्य सिरसाठे यांचे मार्गदर्शन लाभले.
----
स्पर्धेचा निकाल असा...
‘अभिव्यक्ती कौशल्याचा विकास, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’, ‘संशोधनात्मक वृत्ती जोपासणे’ आणि ‘विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे’ हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक संयुक्तपणे कणकवली कॉलेजच्या दीक्षा मळये, प्रेरणा जाधव तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळच्या सर्वेश रेवडेकर आणि सिमरन नदाफ यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या हर्षदा परब आणि कोमल गडम यांच्या गटाला मिळाला. तृतीय क्रमांक कणकवली कॉलेजच्या सानिका मेस्त्री आणि भक्ति सावंत यांनी मिळविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

