पर्यटन
-rat२४p८.jpg-
OP२६O२६९०२
पावस ः गौतमी कांदळवन पर्यटन केंद्रातर्फे आयोजित बोटिंग सफरीत सहभागी झालेले पर्यटक.
-rat२४p७.jpg-
२६O२६९०१
पावस ः कांदळवन सफरीत कांदळवनासह जैवविविधताही पाहता येते.
--------
पावसच्या खाडीत बोट सफारीतून कांदळवन पर्यटन
महिला गटाला रोजगार; पर्यटकांचा प्रतिसाद, गौतमीतील गाळ उपशाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २५ ः पावस परिसरामध्ये धार्मिक स्थळे, समुद्रकिनाऱ्यांबरोबरच पर्यटकांना कांदळवनाची वेगळी बोट सफर करण्याची संधी मिळत आहे. पावसमध्ये गौतमी कांदळवन पर्यटनच्या माध्यमातून दहा महिलांच्या गटाने बोट सफर सुरू करण्यात आली. पुढील दोन महिन्यांमध्ये या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना कांदळवन बोट सफारीचा आनंद लुटता येणार आहे. पर्यटकांना याबाबत माहिती होण्यासाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत.
खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनाची माहिती व्हावी, त्या ठिकाणी आढळणाऱ्या पक्षी निरीक्षणाची माहिती व्हावी त्याचबरोबर महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने मागील वर्षी पावस येथील गौतमी खाडीकिनारी कांदळवन पर्यटन सुरू करण्यात आले. हे पर्यटन येथील दहा महिलांचा गट स्थापन करून त्या माध्यमातून येणाऱ्या पर्यटकांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना कांदळवनातील बोट सफारीचा एक वेगळा आनंद लुटा यावा, यादृष्टीने पर्यटन सुरू करण्यात आले. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी अडीचशे ते तीनशे पर्यटकांनी या सफारीचा आनंद लुटला; मात्र या परिसरात बोटी लावण्यासाठी जेटी नसल्याने भरतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्याचबरोबर खाडीकिनारी गाळ साचल्यामुळे समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
काही तांत्रिक अडचणीमुळे यावर्षी गौतमी कांदळवन पर्यटन बोट सफरीला उशिरा सुरुवात झाली. गेल्या वीस दिवसांमध्ये ४० पर्यटकांनी आतापर्यंत कांदळवन बोट सफरीचा आनंद लुटला आहे. परीक्षेनंतर यामध्ये आणखी वाढ होईल.
---------
कोट
या पर्यटनकेंद्राच्या बोट सफरीच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे; परंतु खाडीमध्ये गाळ असल्यामुळे भरतीच्या व ओहोटीच्या वेळेवर हा व्यवसाय अवलंबून आहे. गाळ उपशाबाबत संबंधित खात्याकडे मागणी करण्यात आली आहे. त्या मागणीचा विचार करून अंमलबजावणी झाल्यास या व्यवसायाला चांगली गती मिळू शकते.
- सुरेखा पावसकर, गौतमी कांदळवन पर्यटन केंद्र
----

