श्रावणी मदभावे यांना होळकर पुरस्कार जाहीर
27106
श्रावणी मदभावे
श्रावणी मदभावे यांना
होळकर पुरस्कार जाहीर
तळेरे : येथील श्रावणी मदभावे यांना २०२२-२३ साठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जाहीर झाला आहे. जिल्ह्यात व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, शिक्षण, युवक प्रबोधन, डिजिटल जागरूकता आणि सामाजिक संस्कार या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबाबत त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मदभावे यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, महिला गट आणि युवक संघटनांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची व्यापक जनचळवळ उभी केली. तंबाखूविरोधी मोहिमा, मानसिक आरोग्य मार्गदर्शन, किशोरवयीन समुपदेशन आणि सामाजिक प्रबोधनात्मक विविध उपक्रम राबविले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमा, समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम राबविले आहेत. या पुरस्काराबाबत त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
....................
27107
शैलेश नाईक
‘बालभारती’कडून
नाईक यांची निवड
सावंतवाडी ः महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांच्यावतीने नव्या शैक्षणिक धोरणावर आधारित सहावीच्या ‘आरोग्य व शारीरिक शिक्षण’ विषयाच्या पाठ्यपुस्तक लेखनासाठी येथील तज्ज्ञ क्रीडाशिक्षक शैलेश नाईक यांची निवड केली आहे. या मंडळावर निवड झालेले ते कोकण विभागातील एकमेव व्यक्तिमत्व ठरले आहेत. नाईक यांची २००५ पासून बदलत्या अभ्यासक्रमात राज्य मार्गदर्शक, अभ्यास मंडळ सदस्य आणि लेखन मंडळ सदस्य म्हणून प्रदीर्घ कारकीर्द राहिली आहे. त्यांनी अकरावी, बारावीच्या क्रमिक पुस्तकांच्या निर्मितीतही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ओळख आहे. हॉकी व कबड्डी या खेळांचे ते राष्ट्रीय पंच आहेत. दोडामार्ग इंग्लिश स्कूल येथून मुख्याध्यापकपदावरून ते निवृत्त झाले असून सध्या येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

