चिपळूणला सभापतीपद

चिपळूणला सभापतीपद

Published on

चिपळूणमधील सभापतिपदासाठी रस्सीखेच
शिक्षण व महिला बालकल्याण; भाजपला की राष्ट्रवादीला मान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मंडणगड तालुक्याला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. चिपळूण तालुक्याला महिला बालविकास आणि शिक्षण खात्याचे सभापतिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी कोणत्या जिल्हा परिषद सदस्याची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपला संधी मिळणार का याची सर्वांना उत्सुकता आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चिपळूण तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले आहेत. भाजपला २० वर्षानंतर चिपळूण तालुक्यात यश मिळाले. भाजपच्या दोन जागा चिपळूण तालुक्यातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता सभापतिपद मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची लॉबींग सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि चिपळूण पंचायत समितीची निवडणूक शिवसेना-भाजप युती म्हणून लढवण्यात आली. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान नव्हते.मात्र आमदार शेखर निकम यांनी पंचायत समितीच्या सात आणि जिल्हा परिषदेच्या तीन जागा निवडून आणल्या. चिपळूण पंचायत समितीत सभापती बसवण्यासाठी जो सहकार्य करेल त्याचा पाठिंबा घेणार असे आमदार शेखर निकम यांनी जाहीर केल्यानंतर ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगली होती. मात्र काही दिवसांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार शेखर निकम एकत्र आले. त्यावेळी ठाकरे गटाला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्यपद हवे आहे. दुसरीकडे भाजपने वीस वर्षानंतर प्रथमच जिल्हा परिषदेत खाते उघडल्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी सभापतिपद तसेच जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शिंदे सेनेचे काही सदस्य जिल्हा नियोजन समिती किंवा सभापतिपद मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.
---
कोट
रत्नागिरी जिल्हा परिषदेत सव्वा वर्षासाठी सभापतिपद दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वांना न्याय मिळेल. पहिल्या टर्ममध्ये कोणाला संधी मिळेल हे वरिष्ठ ठरवतील. चिपळूण पंचायत समितीत शिवसेनेला काय मिळेल आणि जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला काय मिळेल हेही वरिष्ठ ठरवणार आहेत.

-विनोद झगडे, सदस्य, चिपळूण पंचायत समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com