-देवरुखात कुत्र्यांना पकडून नसबंदी

-देवरुखात कुत्र्यांना पकडून नसबंदी

Published on

देवरुखात कुत्र्यांना पकडून नसबंदी
विशेष मोहीम सुरू ; कोल्हापूरच्या संस्थेला ठेका
सकाळ वृत्तसेवा
साडवली, ता. २५ ः देवरूख नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू केली आहे. देवरूखमध्ये भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे नगरपंचायतीने भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन या सोसायटीला याचा ठेका देण्यात आला आहे.
या टीमचे प्रमुख विजय पाटील व त्यांच्या सोबत असलेले एकूण पाच कुत्रे पकडणारे विशेष तज्ज्ञ असून एक गाडीही आहे. ही कुत्रे पकडणारी गाडी व तज्ज्ञ सकाळी मोहीम सुरू करतात. हे कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करून पुन्हा त्यांना पकडलेल्या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे या टीमचे प्रमुख विजय पाटील यांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांमुळे विद्यार्थी, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. देवरुख येथे तालुकास्तरावरील सर्व कार्यालये असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, महिला येत असतात. भटक्या कुत्रे आडवे आल्याने दुचाकीचे अपघात होत आहेत. त्यामुळे या कुत्र्यांना पकडण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला होता.

Marathi News Esakal
www.esakal.com