मोपा विमानतळ परिसरात गवा घुसल्याने खळबळ
27135
मोपा विमानतळ परिसरात
गवा शिरल्याने खळबळ
वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्याने चिंता
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ : सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मंगळवारी (ता. २४) रात्री साडेआठच्या सुमारास एका गव्याने अचानक प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढत असतानाच थेट आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गव्याचे दर्शन झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
गेल्या काही दिवसांपासून गव्यांचे कळप शेती व बागायतीत घुसून मोठे नुकसान करत आहेत. मात्र, यावेळी चक्क विमानतळ परिसरात गवा शिरल्याने कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये काही काळ धावपळ उडाली. विमानतळ प्रशासनाने प्रसंगावधान राखत गव्याला सुरक्षितपणे बाहेर हाकलले. या अनपेक्षित घटनेमुळे विमानतळ परिसरातील अंतर्गत वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही; मात्र विमानतळासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी गव्याचा प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

