मनाचे श्लोक राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरीचे यश
rat२५p१६.jpg-
P२६O२७१३८
पुणे : मनाचे श्लोक राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवणारे रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक.
मनाचे श्लोक स्पर्धेत रत्नागिरीचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट (पुणे) यांच्या संयुक्त आयोजित राज्यस्तरीय मनाचे श्लोक पाठांतर व सूर्यनमस्कार स्पर्धेत रत्नागिरीकरांनी यश मिळवले.
कर्वेनगर, पुणे येथील रमा पुरुषोत्तम नाट्यगृहात या स्पर्धा झाल्या. राज्यातून ४० हजार विद्यार्थ्यांमधून ६६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. एकूण दहा जिल्हे सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील अठरा शाळांचा सहभाग होता. त्यातून ६० विद्यार्थी स्पर्धेसाठी गेले होते. खेळघरापासून ते खुल्या गटापर्यंत भरपूर बक्षिसे रत्नागिरी जिल्ह्याला मिळाली.
पारितोषिक वितरण समारंभाला ब्रह्मचरणी मैत्रेयी चैतन्य (चिन्मय मिशन), डॉ. मनोज देवळेकर, प्रल्हाद राठी उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्याला खूप बक्षीस मिळावी, म्हणून मेहनत घेतली. डॉ. राजीव नगरकर यांचे मार्गदर्शन सर्वांना मिळाले.
-----
विजेत्यांची नावे
स्पर्धेत यश मिळवणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांची नावे- (नाव, क्रमांक व शाळेचे नाव या क्रमाने) श्रीयांश साळवी (द्वितीय, बियाणी बालमंदिर), आयुषी सरदेशपांडे (तृतीय, आनंदीबाई प. अभ्यंकर बालमंदिर), आभा डोंगरे (द्वितीय, स्वामी स्वरूपानंद बालमंदिर, जीजीपीएस), आर्वी मयेकर (उत्तेजनार्थ, जीजीपीएस), दर्श पवार (तृतीय, बियाणी- भिडे आजी बालमंदिर), उर्वी थेराडे (द्वितीय, एम. एन. जोशी स्कूल), विहान पड्यार (तृतीय, ल. ग. पटवर्धन विद्यामंदिर), श्लोक शिंदे (उत्तेजनार्थ, परशुरामपंत अभ्यंकर प्रा. विद्यामंदिर), रुद्राणी मुळ्ये (उत्तेजनार्थ, कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर), शर्व काळे (उत्तेजनार्थ, जीजीपीएस प्राथमिक विद्यामंदिर), अनन्या जोशी (उत्तेजनार्थ, परशुरामपंत अभ्यंकर प्रा. विद्यामंदिर), मीरा मुळ्ये (उत्तेजनार्थ, जीजीपीएस प्राथमिक), सोहम वैद्य (प्रथम, कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर), चैत्राली साळवी (उत्तेजनार्थ, जीजीपीएस प्राथमिक), गौरांग आजगेकर (उत्तेजनार्थ, कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर), मुक्ता बापट (प्रथम, फाटक हायस्कूल), अदिती कातकर (द्वितीय, माखजन इंग्लिश स्कूल, संगमेश्वर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

