''त्या'' तीन भामट्यांचा १८ चोऱ्यांमध्ये समावेश
तिघा संशयितांकडून १८ चोऱ्या उघड
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील विविध मंदिरांतून पितळी घंटा चोऱ्यांचा येथील पोलिसांनी छडा लावला असून तीन भामट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तालुक्यातील १८ चोऱ्यांमध्ये तिन्ही चोरट्यांचा समावेश असल्याने प्रत्येक गुन्ह्यात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पितळी धातूच्या घंटा चोरीप्रकरणी संशयित म्हणून राकेश तुकाराम पडवकर (३७, कुरवंडे-पुणे), जगलाल रामनरेश केवट (५०, खोपोली-रायगड, मूळगाव उत्तरप्रदेश), हिरालाल कुम्हार (पनवेल) या तिघांना गजाआड करण्यात आले आहे. त्या तिन्ही संशयितांकडून आतापर्यंत ८०० किलोहून अधिक पितळी धातूच्या घंटा व मंदिरातील साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. रायगड जिल्ह्यातील तीन चोऱ्यांचा समावेश आहे. उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहोळ, विजेंद्र सातार्डेकर, कृष्णा दराडे, शिरीष साळुंके यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

