इन्सुलीत डंपरला अपघात

इन्सुलीत डंपरला अपघात

Published on

27145

इन्सुलीत डंपरला अपघात
पुलाला धडक ः काम सुरू असलेल्या मार्गावर प्रकार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः इन्सुली सूतगिरणी माडभाकर कोठावळे बांध या मार्गाचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असताना रात्रीच्या सुमारास इन्सुली येथील डांबर प्लांटवरून जाणाऱ्या एका डंपरने बांधकाम सुरू असलेल्या पुलाला अचानक धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतेही मोठे आर्थिक किंवा जीवित नुकसान झाले नाही, मात्र पुलाला धडक बसल्याने ग्रामस्थांमध्ये सुरक्षिततेबाबत भीती निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली व ठेकेदाराला कडक सूचना दिल्या.
श्री. राऊळ यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता श्री. भोसले यांच्याशी संपर्क साधून संबंधित रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी काम सुरू आहे, तिथे रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित करावा आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी त्यांनी केली. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात आणि रस्त्याच्या बाजूलाच मोठी विहीर असल्याने अशा दुर्घटना गंभीर ठरू शकतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भविष्यात या पुलाला कोणताही धोका निर्माण झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ठेकेदाराची राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
संबंधित डांबर प्लांटचे मालक रोहित नाडकर्णी यांना या घटनेबाबत विचारणा केली असता, संबंधित डंपर चालकाला दोन दिवसांपूर्वीच कामावरून काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जर चालकाला कामावरून काढले होते, तर तो रात्री अचानक डंपर घेऊन तेथे कसा काय गेला आणि एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल राऊळ यांनी उपस्थित केला. घटनेनंतर क्रेनच्या साहाय्याने डंपर बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ प्रदीप कोठावळे, ठेकेदार महेश धुरी, निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, प्रशांत वारंग, रामचंद्र कोठावळे, पिंट्या नाईक, शिर्के भाऊ, भिवा मुळीक, आप्पा आमडोसकर, अनंत वारंग, सुजय कोठावळे यांसह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com