वैभववाडीसाठी सव्वातीन कोटी

वैभववाडीसाठी सव्वातीन कोटी

Published on

वैभववाडीसाठी सव्वातीन कोटी

नगराध्यक्षांची माहिती; रस्ते, सोलर, गटार, विहिरींसाठी निधी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ : शहरातील रस्ते बांधणी, सोलर युनिट, गटार बांधणी आणि विहीर बांधणी आदी विविध विकासकामांसाठी ३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे यांनी दिली.
नगराध्यक्ष सौ. रावराणे यांनी दालनात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, की खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांनी वैभववाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील प्रलंबित कामे झपाट्याने मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री राणे नगरपंचायतीला सतत निधी देत असतात. आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी दिला आहे. आतादेखील वैभववाडी शहरासाठी ३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
मंजूर निधींतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. यात वाभवे-वैभववाडी नगरपंचायत हद्दीत सोलर हायमास्ट पथदिवे उभारणे व पाणीपुरवठा विहिरीवर ग्रीड-आधारित सोलर यंत्रणा उभारणे (१ कोटी), प्रभाग क्र. १७ मध्ये सतीश रावराणे घर ते भैरू गुरखे घरापर्यंत रस्ता तयार करणे (५० लाख), लांजवळवाडी येथे विहीर बांधणी व पिण्याच्या पाण्याची सोय करणे (२५ लाख), कला दालनाची सुधारणा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (१० लाख), आमकरवाडी रस्ता बांधणी (३० लाख), नगरपंचायत ते मच्छीमार्केट बंदिस्त गटार बांधणी (२५ लाख), करगुंटकर घर ते बोभाटे घराकडे जाणारा रस्ता तयार करणे (३० लाख), आदिष्टी मंदिर परिसर सुशोभीकरण (२० लाख), मच्छीमार्केट ते महाकाली कॉम्प्लेक्स रस्ता बांधणी (२५ लाख), नगरपंचायत हद्दीतील रस्त्यांवर थर्माप्लास्टिक बसविणे (१० लाख), अशी तरतूद केली आहे. ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील राहील, असेही रावराणे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com