मंडणगड पंचायत समितीत बक्षीस वितरण

मंडणगड पंचायत समितीत बक्षीस वितरण

Published on

मंडणगड पंचायत समितीत कर्मचाऱ्यांचा गौरव
मंडणगड ः मंडणगड पंचायत समितीच्या कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक उपक्रमांच्या पारितोषिक वितरण समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झाला. यामध्ये आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सुनील खरात, माजी आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, अस्मिता केंद्रे, पंचायत समिती सदस्य दीप्ती घडशी, पक मालुसरे व अनिल रटाटे आदी उपस्थित होते. क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी विजेत्या खेळाडू व संघांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट, महिला क्रिकेट तसेच रस्सीखेच स्पर्धांतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. विविध विभागांतील उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मचाऱ्यांना ‘आदर्श कर्मचारी’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com