कुंभार समाजातर्फे पुरस्कार

कुंभार समाजातर्फे पुरस्कार

Published on

लोकप्रतिनीधींच्या सत्कारासह पुरस्कारांचे वितरण
चिपळूण ः चिपळूण तालुका कुंभार समाजाचा जाहीर मेळाव्याचे आयोजन शनिवारी (ता. २८) करण्यात आले आहे. यानिमीत्ताने कुंभार समाजातील नवनिर्वाचीत राजकीय लोकप्रतिनीधींचा गौरव केला जाणार आहे. तसेच कुंभार समाजात विशेष योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार आहे. कापसाळ येथील पाटीदार भवन येथे २८ रोजी सकाळी ९ वाजता हा मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याचे उद्‍घाटन महासंघाचे संस्थापक सतीश दरेकर यांच्याहस्ते होणार असून अध्यक्षस्थान कुंभार समाजाचे प्रदेशाध्यक्ष रमांकात क्षीरसागर भूषवणार आहेत. मेळाव्यात कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. यामध्ये सतीश दरेकर यांना समाजरत्न, सुनिल टेरवकर (सहकारभूषण), सुरेश बुरबाडकर ( व्यवसायभूषण), प्रकाश साळवी (समाजरत्न), तुकाराम साळवी (समाजभूषण), पूनमचंद भावसार (विद्याभूषण) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com