आद्यपत्रकार जांभेकर यांना वंदन

आद्यपत्रकार जांभेकर यांना वंदन

Published on

27165

आद्य पत्रकार जांभेकर यांना वंदन
तळेरे : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१४ वी जयंती पोंभुर्ले येथे जर्नालिस्ट युनियन महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. यावेळी जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील वंशज सुधाकर जांभेकर व कुटुंबीय उपस्थित होते. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे शासकीय आदेश आहेत. जांभेकरांच्या मूळ गावी पोंभुर्ले येथे शासनाच्या वतीने अभिवादन झाले पाहिजे होते; मात्र शासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी येथे फिरकला नसल्याची खंत श्री. पांचाळ यांनी व्यक्त केली. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पत्रकार राजेंद्र साळसकर, खजिनदार सतीश साटम, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार उदय दुधवडकर, सचिव संजय खानविलकर, महाराष्ट्र जर्नालिस्ट युनियनचे सिंधुदुर्ग अध्यक्ष गणेश चव्हाण, सुनील आचरेकर, बाजीराव जांभेकर, दळवी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत हाटकर आदी पत्रकार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com