कुणकेश्वर यात्रेतून सात लाखांचे उत्पन्न

कुणकेश्वर यात्रेतून सात लाखांचे उत्पन्न

Published on

कुणकेश्वर यात्रेतून सात लाखांचे उत्पन्न

देवगड आगार : उप्तन्नात पटकावले अव्वल स्थान

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवामध्ये येथील आगाराने सुमारे ६ लाख ५७ हजार ४८३ रुपये इतके उत्पन्न मिळविले. यातील कणकवली रेल्वेस्थानक ते देवगड कुणकेश्वर या बसफेरीचे चालक ए. के. इंदप व वाहक व्ही. आर. सावंत यांनी सर्वाधिक सुमारे ५७ हजार ८९२ रुपये इतके उत्पन्न आणून उत्पन्नात अव्वल स्थान मिळवले.
तालुक्यातील कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवासाठी येथील आगाराच्यावतीने तालुक्याच्या विविध भागातून फेऱ्यांचे नियोजन केले होते. यामध्ये देवगड-कुणकेश्वर ते कणकवली रेल्वेस्थानक या बसफेरीसह बोरीवली मार्गावर एक जादा प्रवासी फेरीही सोडली होती. यात्रेतील प्रवासी सेवेतून आगाराने सर्व सवलतींसह एकूण ४८५ प्रवासी बसफेऱ्यांद्वारे सुमारे १३ हजार २४९ किलोमीटरचा प्रवास केला. एकूण सुमारे २३ हजार ३६६ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. यातून आगाराला सुमारे ६ लाख ५७ हजार ४८३ रुपये इतके उत्पन्न मिळाले.
नांदगाव तळेरे कुणकेश्वर या मार्गावरील फेरीचे चालक एस. यू. बटवाले आणि वाहक जे. एस. गोरुले यांनी १२५७ प्रवाशांच्या माध्यमातून ९४१ किलोमीटरच्या प्रवासाद्वारे सुमारे ४९ हजार ४७० रुपयाचे उत्पन्न आणून द्वितीय क्रमांक, चालक पी. एस. तोरसकर व वाहक एस. एस. साटम यांनी यांनी ९८९ प्रवाशांच्या माध्यमातून ७८२.०२ किलोमीटरच्या प्रवासाद्वारे ४० हजार २३७ रुपये एवढे उत्पन्न आणून तृतीय क्रमांक, चालक एन. एल. साटम व वाहक एस. पी. परब यांनी १०४७ प्रवाशांच्या माध्यमातून ७२९ किलोमीटरच्या प्रवासाद्वारे ३५ हजार ४८१ रुपये उत्पन्नासह चतुर्थ क्रमांक, तसेच चालक एम. डी. जाधव व वाहक आर. व्ही. रावरे यांनी ८७४ प्रवाशांच्या माध्यमातून ७४३ किलोमीटरच्या प्रवासाद्वारे ३५ हजार ४१ रुपये एवढे उत्पन्न आणले.
विभाग नियंत्रक दीपक घोडे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रमकुमार देशमुख, यंत्र अभियंता सुजित डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच येथील आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप यांच्या नेतृत्वाखाली स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सचिन डोंगरे यांच्यासमवेत यू. बी. मोहिते, के. व्ही. कांबळे, पी. बी. राजम, आर. सी. मणचेकर, ए. पी. रावले, एस. के. पवार, बी. एस. जाधव, ए. व्ही. कदम, ए. पी. पाटील, महिला वाहतूक नियंत्रक पी. व्ही. बांदेकर, पी. पी. शिंदे, तसेच कार्यशाळा अधीक्षक, वाहन परीक्षक कार्यशाळा कर्मचारी, चालक वाहक आदींनी यात्रा कालावधीत कामगिरी बजावली. दरम्यान, गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे २०७१ किलोमीटरमध्ये वाढ करून विनासवलत उत्पन्नात सुमारे २० हजार ७५४ रूपये इतकी वाढ झाल्याचे आगाराच्यावतीने सांगण्यात आले.
---
चालक इंदप, वाहक सावंतांचे उत्कृष्ट कार्य
कणकवली रेल्वेस्थानक ते देवगड कुणकेश्वर या बसफेरीचे चालक श्री. इंदप व वाहक श्री. सावंत यांनी सर्वाधिक सुमारे ५७ हजार ८९२ रुपये इतके उत्पन्न आणून उत्पन्नात अव्वल स्थान मिळवले. त्यांनी ९५६.०६ किलोमीटरच्या प्रवासात एकूण १२५६ प्रवाशांची वाहतूक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com