-संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी १७ मार्चपासून बेमुदत उपोषण

-संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी १७ मार्चपासून बेमुदत उपोषण

Published on

संगमेश्वर–पाटण घाटमार्ग रखडला
सर्वेक्षण कामात दिरंगाई ; १७ मार्चपासून बेमुदत उपोषण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः संगमेश्वर-पाटण घाटमार्गाच्या सर्वेक्षण व आराखडा तयार करण्याच्या कामात होत असलेल्या दिरंगाईविरोधात समन्वयक संतोष येडगे यांनी १७ मार्चपासून मंत्रालय येथे बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. कार्यारंभ आदेशाला १४ महिने उलटूनही काम सुरू न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राथमिक विकास आराखड्यासाठी २४ डिसेंबर २०२४ ला मोनार्च इंजिनिअरिंग कंपनीला कार्यारंभ आदेश दिला. मात्र १४ महिने उलटूनही सर्वेक्षण सुरू झालेले नाही. यापूर्वी २०१८ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाली होती, तर या घाटमार्गाचे भूमिपूजन १९९९ मध्ये झाले होते. तब्बल २७ वर्षांनंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नाराजी वाढली आहे. यासंदर्भात संतोष येडगे यांनी ३० सप्टेंबर २०२५ व ८ जानेवारी २०२६ ला अपर मुख्य सचिवांकडे पाठपुरावा केला होता. तातडीच्या सूचनांनंतरही काम प्रलंबित असल्याने १७ मार्चपासून मंत्रालयात बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
------
चौकट
१२३ कि.मी.चा वळसा वाचेल
सुमारे ४६.६०९ किमी लांबीचा हा घाटमार्ग पूर्ण झाल्यास रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील साडेतीन ते चार लाख लोकसंख्येला थेट फायदा होणार आहे. सध्या १२३ किलोमीटरचा वळसा घालावा लागत असताना हा मार्ग सुरू झाल्यास अंतर ४६ किलोमीटरवर येऊन सुमारे ८० किमीची बचत होणार आहे. त्यामुळे दळणवळण, बाजारपेठा, पर्यटनाला चालना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com