गाबीत समाजाचे राजकीय प्राबल्य वाढवा

गाबीत समाजाचे राजकीय प्राबल्य वाढवा

Published on

27178

गाबीत समाजाचे राजकीय प्राबल्य वाढवा

परशुराम उपरकर ः मालवणात लोकप्रतिनिधींचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २५ : जिल्ह्यातील नगरपालिका व पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या गाबीत समाजाच्या लोकप्रतिनिधींनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी आणि उत्कर्षासाठी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करावा. राजकारणात गाबीत समाजाची ताकद आणि प्रभाव वाढणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे केले.
गाबीत समाज, सिंधुदुर्गतर्फे शहरातील धुरीवाडा येथील संस्कार हॉलमध्ये नुकताच नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर म्हणाले, ‘‘मालवण, वेंगुर्ले व देवगडच्या किनारी भागात गाबीत समाजाची मोठी वस्ती आहे. निवडणुकांमध्ये समाजाचे प्राबल्य असणे महत्त्वाचे असून समाजाने आपली एकजूट दाखवणे आवश्यक आहे. सध्या किनारपट्टीवरील मच्छीमार व पर्यटन व्यावसायिकांना प्रशासनाकडून बांधकामविषयक नोटिसा येत आहेत. हे सर्व आपलेच बांधव असून या अन्यायाविरुद्ध गाबीत समाज म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. या लढ्यात गाबीत समाज संघाचे पूर्ण सहकार्य लाभेल.’’
कार्यक्रमात नगरसेवक सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, नगरसेविका अन्वेषा आचरेकर, मेघा गावकर, पंचायत समिती सदस्य प्रियांका घाटवळ (रेडी), नगरसेवक रविकिरण तोरसकर, नगरसेविका शिल्पा केळुसकर, जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी आपल्या भावना व्यक्त करताना समाजाकडून मिळालेल्या या सन्मानाने भारावून गेलो असून समाजाच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू, अशी ग्वाही दिली.
या सोहळ्याला कार्याध्यक्ष रत्नकुमार झाजम, हरी खोबरेकर, सरचिटणीस महेंद्र पराडकर, लक्ष्मण तारी, माजी उपसभापती विलास ताम्हणकर, मच्छीमार नेते वसंत तांडेल, मेघनाद धुरी, बाबा नाईक, लक्ष्मीकांत खोबरेकर, उपाध्यक्ष रमेश तारी, श्रमजीवी रापण संघाचे अध्यक्ष दिलीप घारे, पारंपरिक मच्छीमार संघटनेचे नेते बाबी जोगी, खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य पवनकुमार पराडकर, राधिका कुबल, दीक्षा ढोके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com