क्राइम
ग्राईंडर पायावर गेल्याने तरुण गंभीर
रत्नागिरी ः शहरातील मिरकरवाडा येथे दरवाजा बनवण्यासाठी प्लायवूड ग्राईंडरने कट करत असताना ग्राईंडर चूकून पायावर गेल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. ही घटना आज दुपारी घडली. शरीफउल अनादअली इस्लाम (२८,रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी घरात कोणीही नसताना शरीफउल इस्लाम हा घरातील दरवाजा बनवण्यासाठी ग्राईंडरने दरवाजा कट करत होता. त्यावेळी अचानकपणे तो ग्राईंडर त्याच्या डाव्या पावलावर गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
दुचाकी टोईंग व्हॅनवर आदळून दोघे जखमी
रत्नागिरी ः बेदरकारपणे दुचाकी चालवून ती टोईंग व्हॅनवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या मित्रावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताची ही घटना रविवारी ( ता. २२) रात्री घडली. ओमसाई अजय मकवाना (१८,रा.कोकणनगर,रत्नागिरी) गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. रविवारी रात्री ओमसाई दुचाकीवर मित्र हर्षित सुभाष मांजरेकर (१७,रा.शिवाजीनगर,रत्नागिरी) याला बसवून कोकणनगर ते जयस्तंभ असे जात होते. ते महिंद्रा शोरूम समोर आले असता त्यावेळी एक टोईंगव्हॅन गाडी लोड करून शोरुमच्या गेटमधून आत जात असताना या भरधाव दुचाकीची त्या टोईंगव्हॅनला धडक बसून हा अपघात झाला. या अपघाताची नोंद जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

