‘माझी सुंदर शाळा’मध्ये पणदूर हायस्कूल अव्वल
27207
‘माझी सुंदर शाळा’मध्ये
पणदूर हायस्कूल अव्वल
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य (कै.) शशिकांत अणावकर विद्यानगरी पणदूर तिठा या शाळेने मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा टप्पा ३’ या राज्यस्तरीय अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तालुक्यातील वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित या शाळेने उपक्रमात सहभाग घेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. शाळेच्या परिसरात आकर्षक भित्तीचित्रे, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, किचन गार्डन तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व प्रेरणादायी संदेश देणारे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. या यशात संस्था व संचालक मंडळ, मुख्याध्यापक संजय गावकर, पर्यवेक्षक एम. जी. कर्पे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे एकत्रित प्रयत्न कारणीभूत ठरले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता, शिस्त व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता दाखवत आदर्श निर्माण केला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आपासाहेब गावडे, संस्था सचिव नागेंद्र परब, उपाध्यक्ष प्रकाश जैतापकर, सर्व संस्था पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी शाळेचे कौतुक केले. शाळेच्या या यशाबद्दल तालुक्यात अभिनंदन होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

