गुहागर बाजारपेठेतील ररस्त्याची चाळण
गुहागर बाजारपेठेतील रस्त्याची चाळण
नागरिक, वाहनचालक आक्रमक : डांबरीकरणाची मागणी, ‘सार्वजनिक बांधकाम’ला निवेदन
(फोटो पानाशेजारील वापरा)
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः गुहागर बाजारपेठ ते पोलिस ठाणे या रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांसह नागरिकांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे गुहागरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. येथील रस्ता डांबरी करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत नगरसेविका अनुषा भावे व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.
गुहागर बाजारपेठेतील रस्त्याचे पेवर ब्लॉकऐवजी पूर्ण डांबरीकरण करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. गुहागर बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यापैकी बाजारपेठेतील खराब १५० मीटर लांबीच्या दुरुस्तीचे नियोजनात ८० मीटर भागात पेवर ब्लॉक बसवण्यात येणार होते. पेवर ब्लॉक इंटरलॉकिंग असल्याने त्यांच्या फटीतून पाणी खाली मुरते, ज्यामुळे पाया कच्चा होऊन रस्ता खचतो. तसेच बाजारपेठेत पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उतार नसल्यास पेवर ब्लॉकवर पाणी साचून राहील. बाजारपेठेत वाहनांची आणि खरेदीसाठी येणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी पेवर ब्लॉक निसरडे होऊन किंवा कालांतराने ते वर आल्यास अपघात घडू शकतो. याचा विचार प्रशासनाने गांभीर्याने करावा आणि येथे पेवर ब्लॉक ऐवजी दर्जेदार डांबरीकरण करून पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करावा. अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबत प्रशासन या भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.
-----
तातडीने उपाययोजना कराव्यात
गुहागर बाजारपेठ ते पोलिस ठाणे या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची आणि पादचाऱ्यांना मोठी कसरत कारवी लागते. त्यामुळे नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाने करून तातडीने या येथील रस्ता डांबरी करावा अशी मागणी स्थानिकांतून जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

