वधू-वर मेळाव्यास मुंबईत प्रतिसाद
swt262.jpg
27302
मुंबई ः वधू-वर परिचय मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना रघुवीर वायगंणकर.
वधू-वर मेळाव्यास
मुंबईत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. २६ ः क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने मुंबई-दादर येथे वधू-वर व पालक परिचय मेळावा उत्साहात झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांनी उपस्थित असलेल्या वधू-वरांना मार्गदर्शन करताना उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
सर्व समाज एकत्रित आणि संघटित ठेवणे ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी वधू-वर सूचक समितीचे अध्यक्ष विकास घाडीगावकर, दर्शना घाडी, आर्या घाडी, रश्मी घाडीगावकर, रामचंद्र घाडीगावकर, अनघा गावकर, रघुनाथ घाडीगावकर, संतोष घाडीगावकर, मोहन कुळकर, संदीप घाडी, अभिजित घाडी आदी उपस्थित होते.
मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष नंदकुमार घाडीगावकर यांनी सर्वांचे आभार मानले. या मेळाव्यासाठी वधू वर व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विकास घाडी यांनी सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख करून दिली.
.....................
swt263.jpg
O27303
देवगड : तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला.
बापर्डे ग्रामपंचायतीचा
नवी मुंबईत सन्मान
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत झालेल्या २०१९-२० च्या मूल्यांकनामध्ये तालुक्यातील बापर्डे ग्रामपंचायतीने विभागात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल बेलापूर, (नवी मुंबई) येथे आयोजित कार्यक्रमात कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन बापर्डे ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, संजय लाड, गुणवंत राणे, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी शिवराज राठोड, ग्रामपंचायत अधिकारी विजू देवीसिंग घुनावत, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, सुविधा पुजारे, रवीना मुळक, प्रियांका राणे, संदीप नाईकधुरे, जीवन नाईकधुरे, समूह समन्वयक विनायक धुरी, ग्रामपंचायत कर्मचारी विजय मेस्त्री, प्रशांत देवळेकर, सरोज नाईकधुरे तसेच प्रवीण राणे आदी उपस्थित होते. बापर्डे ग्रामपंचायतीने केलेल्या गावातील विविध यशस्वी उपक्रमांची पाहणी करण्यासाठी राज्यातील विविध जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी वेळोवेळी भेट देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

