सावंतवाडी-काजरमळी-वेंगुर्ले बस फेरी नियमित करा
swt265.jpg
27305
वेंगुर्ले ः आगार व्यवस्थापकांना निवेदन देताना सुजाता पडवळ व इतर.
सावंतवाडी-काजरमळी-वेंगुर्ले
बस फेरी नियमित करावी
सुजाता पडवळ ः प्रशासनास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २६ ः येथील आगाराची सायंकाळी ४.२० वाजता सावंतवाडी येथून सुटणारी सावंतवाडी-काजरमळी मार्गे वेंगुर्ला ही बस दररोज, विनाअडथळा सुरळीत सुरू ठेवावी, यासाठी तुळस मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ यांनी ग्रामस्थांसहित निवेदनाद्वारे वेंगुर्ले आगाराचे लक्ष वेधले. सावंतवाडी-तुळस-काजरमळी मार्गे वेंगुर्लेला जाणारी दैनंदिन बस या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची वाहतूक सुविधा आहे. या बस सेवेवर विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. अलीकडच्या काळात ही बस अनियमितपणे किंवा काही वेळा रद्द होत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व नोकरदारांचे कार्यालयीन वेळापत्रक कोलमडले आहे. या बाबींचा विचार करून ही बस नियमित व वेळेत सुरू ठेवावी, अशी मागणी सुजाता पडवळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी ग्रामस्थ समिता भगत, प्राची गोळम, वैष्णवी सावंत, गायत्री पांगम, साक्षी पांगम, नितीन कोचरेकर, गुंडू परब, आत्माराम आरमारकार तसेच काजरमळी ग्रामस्थ उपस्थित होते.

