राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत गोगटे-जोगळेकर प्रथम
प्रश्नमंजूषेत गोगटे-जोगळेकर प्रथम
‘डीबीजे’चा उपक्रम; रत्नागिरी, सिंधुदुर्गतील विद्यार्थी सहभागी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ ः येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाच्यावतीने ‘इकोज इको २०२५-२६’ या राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावत फिरता चषकावर नाव कोरले.
डीबीजे महाविद्यालयाच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांना आणि सर्जनशीलतेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य बापट यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी संघ सहभागी झाले होते. या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत फिरता चषक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम मिळवली. आठल्ये-सप्रे-पित्रे (ASP)महाविद्यालय, देवरूख संघाने द्वितीय तर यजमान डीबीजे महाविद्यालय, चिपळूण संघाने तृतीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्या संघांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांचा सत्कार नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य अविनाश जोशी, प्राचार्य बापट व अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. नामदास यांच्या हस्ते करण्यात आला. परीक्षक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. चव्हाण, प्रा. डॉ. दिनेश पारखे व प्रा. प्रिया खवले यांनी काम पाहिले.
------
चौकट
अर्थविषयक माहितीवर आधारित प्रदर्शन
महाविद्यालयातील पोस्टर प्रदर्शनात आरबीआयचे गव्हर्नर, पंचवार्षिक योजना, वित्तआयोग, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते, भारतीय चलनाची उत्क्रांती व नोटांचा इतिहास, रत्नागिरी जिल्ह्यातील तालुक्यांची तसेच विविध अर्थशास्त्रज्ञांची माहिती अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी सखोल माहिती संकलित करून अत्यंत आकर्षक पोस्टर्स सादर केली होती. नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त उपाध्यक्ष डॉ. दीपक विखारे यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

