आशासेविका ईश्वरी जाधव आरोग्य रत्न पुरस्कार
-rat२६p८.jpg-
२६O२७३३८
मंडणगड: वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारप्राप्त आशासेविका ईश्वरी जाधव यांचा सत्कार करताना गटविकास अधिकारी सुनील खरात. शेजारी डॉ.अभिषेक गावंडे व मान्यवर.
------
ईश्वरी जाधव यांना आरोग्यरत्न पुरस्कार
मंडणगड पंचायत समितीकडून गौरव; आरोग्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.२६ ः तालुक्यातील कुंबळे येथील म्हाप्रळ उपकेंद्रातील आशा स्वयंसेविका ईश्वरी जाधव यांना आरोग्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यशासनाचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
‘महाआरोग्य सन्मान २०२६’ कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. या यशाबद्दल पंचायत समिती व आरोग्य विभागाच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार आज गटविकास अधिकारी यांच्या दालनात झाला. या वेळी गटविकास अधिकारी सुनील खरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, तालुका समूह संघटक योगेश यादव, विस्तार अधिकारी तातू पारधी, खान, प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या गटप्रवर्तक साक्षी सापटे आदी उपस्थित होते. सर्वांनी जाधव यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील आरोग्यसेवेत आशा स्वयंसेविकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, ईश्वरी जाधव यांचा हा सन्मान संपूर्ण मंडणगड तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

