कोकणचा पारंपरिक ''आट्यापाट्या'' खेळ होतोय नामशेष

कोकणचा पारंपरिक ''आट्यापाट्या'' खेळ होतोय नामशेष

Published on

‘आट्यापाट्या’ खेळ होतोय नामशेष
नवसंजीवनीची गरज; संतसाहित्यात उल्लेख
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः कोकणची भूमी ही सण, उत्सव आणि देशी मैदानी खेळांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र, होळीच्या सणापूर्वी संपूर्ण कोकणात उत्साहाने खेळला जाणारा ‘आट्यापाट्या’ हा पारंपरिक खेळ आता हळूहळू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. आधुनिक खेळांचे आक्रमण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हा चैतन्यपूर्ण खेळ ग्रामीण भागातूनही लुप्त होत असल्याचे चिंताजनक चित्र दिसत आहे.
आट्यापाट्या हा केवळ खेळ नसून, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. भारताच्या अनेक राज्यांत हा खेळ वेगवेगळ्या नावाने खेळला जातो. विशेष म्हणजे, संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांमध्येही या खेळाचे संदर्भ आढळतात. यावरून हा खेळ शिवकाळापूर्वीपासून जनमानसात लोकप्रिय असल्याचे स्पष्ट होते. कोकणात तर होळीच्या १० दिवस आधी या खेळाचा श्रीगणेशा होतो आणि धुलिवंदनाच्या दिवशी याची सांगता होते. दोन संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या खेळात प्रचंड शारीरिक क्षमतेचा कस लागतो. ठराविक चौकोनी जागेत (पाट्यांवर) प्रतिस्पर्ध्याला रोखणे, त्याची कोंडी करणे आणि प्रतिस्पर्ध्याने हुलकावणी देत निसटून जाणे, असा हा थरार असतो. पाठलाग करणे, हुलकावणी देणे आणि सांघिक रणनीती आखणे यांमुळे हा खेळ प्रेक्षकांसाठीही अत्यंत रंजक ठरतो.
एकेकाळी गावागावांत तरुण आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आट्यापाट्याचा आनंद लुटत असत; मात्र,आता परिस्थिती बदलली आहे. आजच्या अनेक मुला-मुलींना या खेळाचे नावही माहीत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com