हाय अल्टीट्युड बलूनचे यशस्वी प्रक्षेपण
-rat२६p९.jpg-
P२६O२७३४१
रत्नागिरी ः भाट्ये किनाऱ्यावरून अवकाशात झेपावलेला बलून.
-rat२६p१०.jpg-
P२६O२७३४०
रत्नागिरी ः भाट्ये किनाऱ्यावर बलूनचे यशस्वी लाँचिंग करण्यासाठी उपस्थित विद्यार्थी.
-----
भाट्ये किनाऱ्यावरून विज्ञानाची अवकाशभरारी
राज्यातील पहिल्या ‘हायअल्टिट्यूड बलून’चे प्रक्षेपण ; रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी रचला नवा इतिहास
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आज विज्ञानाचा नवा इतिहास रचला गेला. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आणि ‘सिलिकॉन टेक हिल्स’ व ‘ग्रहस्पेस’च्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिला ‘हायअल्टिट्यूड बलून’ (High Altitude Balloon) प्रक्षेपण सोहळा उत्साहात झाला. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले तंत्रज्ञान अवकाशात झेपावले असून, यातून भविष्यातील शास्त्रज्ज्ञ घडतील, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेचे ५० विद्यार्थी नासा व इस्रोच्या शैक्षणिक दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यानंतर केवळ पुस्तकी ज्ञान न ठेवता विद्यार्थ्यांना उपग्रह प्रक्षेपण आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी चारदिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून आज भाट्ये किनाऱ्यावरून या ‘बलून’चे यशस्वी लाँचिंग करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, कोस्टगार्डचे कमांडर शैलेश गुप्ता, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी किरण लोहार, ग्रहस्पेसचे मलयकुमार बिस्वाल, प्रदीप राजन, अजित गुरव, सागर साळुंखे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या, रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुरू केलेला इस्रो-नासा दौरा हा राज्यातील एकमेव उपक्रम आहे. केवळ सहल न काढता यातून उद्याचे संशोधक निर्माण व्हावेत आणि भारताची शान वाढवणारे काम आपल्या विद्यार्थ्यांच्या हातून व्हावे, हीच आमची मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी अंशुल पाटील, शौर्य जाधव आणि शिवसमर्थ मुंडे यांनी अनुभव व्यक्त केले.
------
चौकट
या ‘बलून’चे वैशिष्ट्य
* जमिनीपासून साधारण १५ किमी उंचीवर झेपावला.
* सुमारे २ ते २.५ तासांच्या प्रवासात कार्यान्वित.
* हवामानातील बदल टिपणे, उंचावरून फोटोग्राफी करणे
आणि महत्त्वपूर्ण डाटा संकलित करणे.
* प्राप्त डाटा विद्यार्थ्यांच्या पुढील संशोधनासाठी उपयुक्त ठरणार
------
कोट
ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे थवे उभे केले त्याच भूमीवर आजचे तरुण मावळे ‘सॅटेलाईट’ आणि ‘बलून लाँचिंग’चे यशस्वी प्रयोग करत आहेत, ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
- नितीन बगाटे, जिल्हा पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

