दुचाकीची मोटारीला धडक, स्वारावर गुन्हा

दुचाकीची मोटारीला धडक, स्वारावर गुन्हा

Published on

दुचाकीची मोटारीला
धडक, स्वारावर गुन्हा
रत्नागिरी ः शहरानजीकच्या शिळ धरणाजवळ बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणाऱ्या मोटारीला धडक दिल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात ३१ डिसेंबर २०२५ ला झाला होता. वेदांत उदय वाजे (वय २५,रा.टीआरपी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सहाय्यक पोलिस फौजदार राजेंद्र सावंत यांनी तकार दिली आहे. ३१ डिसेंबरला मोटारचालक मकसूत रमजान शिरगावकर (५४,रा.मिल्लतनगर मजगाव रोड,रत्नागिरी) हे मोटारीने रत्नागिरी ते जाकादेवी असे जात होते. त्याच सुमारास वेदांत वाजे हा दुचाकीने समोरुन येत होता. शिळ धरणाजवळील रस्त्यावर वेदांतचा दुचाकीवरील ताबा सूटला आणि त्याने समोरून येणाऱ्या शिरगावकर यांच्या मोटारीला धडक दिली. यामध्ये वेदांतला दुखापत झाली. याप्रकरणी २५ फेब्रुवारीला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------

मोटारीची वद्धाला धडक,
चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः मोटारीने वृद्ध पादचारी जब्बार ईस्माईल बंदरी (वय ७०,रा.चांदेराई,रत्नागिरी) यांना धडक दिल्याप्रकरणी मोटारचालक महिलेविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात १७ फेब्रुवारीला शिवाजीनगर येथे झाला होता. डॉ. भाग्यश्री मनोहर हेडाउ (वय ३५, रा. साई समर्थ अपार्टमेंट कोर्ले रोड,लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल शरद कांबळे यांनी तक्रार दिली. १७ फेब्रुवारीला सायंकाळी भाग्यश्री हेडाउ मोटार घेउन मारुती मंदिर ते लांजा अशा जात होत्या. शिवाजीनगर येथील प्रवीण सुपर मार्केटसमोर आली असता तिने पादचारी जब्बार बंदरी यांना धडक देत अपघात केला. यात त्यांना दुखापत होउन गाडीचेही नुकसान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com