-सोमेश्वर मार्गे ‘कीरबाग‘-हातिसला जाणाऱ्या पुल पूर्ण

-सोमेश्वर मार्गे ‘कीरबाग‘-हातिसला जाणाऱ्या पुल पूर्ण

Published on

rat२६p२१.jpg-
२६O२७४२३
रत्नागिरी- सोमेश्वर मार्गे ‘कीरबाग‘-हातीसकडे जाणाऱ्या पुलाचे बांधकाम पूर्ण
-----
‘सोमेश्वर-कीरबाग-हातिस’वरील पूल पूर्ण
ग्रामविकास समितीच्या पाठपुराव्याला यश ; पर्यटक सुखावले, दळणवळणाची समस्या निकाली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : तालुक्यातील प्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या हातिसला जाणे आता आणखी सोपे झाले आहे. सोमेश्वर मार्गे कीरबागहून हातीसकडे जाणाऱ्या पुलाचे बहुप्रतीक्षित काम पूर्ण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांकडून या पुलाची मागणी केली जात होती. पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनामधून ६५ लाख रुपयांचा भरीव निधी दिला होता. या निधीतून हा प्रशस्त पूल उभारण्यात आला आहे. यामुळे मंदिर परिसरातील दळणवळणाची समस्या कायमची निकाली निघाली आहे.
निसर्गरम्य सोमेश्वर परिसरात किरबागकडे जाण्यासाठी पूर्वीचा मार्ग अत्यंत अरुंद आणि कच्चा होता. विशेषतः पावसाळ्यात तेथील नदीला पाणी आल्यावर या मार्गावरून प्रवास करणे अशक्य व्हायचे. ज्यामुळे भाविक आणि परिसरातील ग्रामस्थांना मोठया संकटाचा सामना करावा लागत होता. नव्याने उभारण्यात आलेल्या या भक्कम पुलामुळे पावसाळ्यातील अडथळे दूर झाले आहेत. सोमेश्वर कीरबाग-हातीस परिसर मुख्य प्रवासाशी जोडला जाऊन अंतरदेखील कमी झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना भक्कम संरक्षक कठडे बांधण्यात आले आहेत. पुलाची रुंदी पुरेशी असल्याने आता सोमेश्वर परिसरातून मोठया वाहनांची ये-जा करणे सोपे झाले आहे. याचा सर्वाधिक फायदा स्थानिकांना होणार आहे. हातिस ग्रामविकास मंडळ व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी या कामासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता यश आले आहे.
----
चौकट
परिसराच्या विकासाला चालना
या पुलामुळे केवळ दळणवळणाची सोय झाली नसून, मंदिर परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या हजारों भाविकांनी आणि पर्यटकांनी या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. निसर्गसौंदर्य आणि या रस्ता सुविधा यांचा मेळ बसल्याने हा परिसर अधिकच विकसित होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com