कानिटकर स्मृती व्याख्यानमाला
rat२७p२.jpg-
P२६O२७५०१
रत्नागिरी : प्रा. एस. व्ही. कानिटकर स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित स्पर्धेत यश मिळवणारे विद्यार्थी आणि मागे उभे वक्ते प्रा. सलील सावरकर, डॉ. राजीव सप्रे आदी.
----
संख्यादर्शन विषयावर व्याख्यानमाला
गोगटे महाविद्यालयात आयोजन; गुणवंताचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) गणित विभागातर्फे प्रा. एस. व्ही. कानिटकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उल्हासनगरच्या श्रीमती चांदीबाई मनसुखानी महाविद्यालयातील प्रा. सलील सावरकर यांनी भारतीय गणितातले संख्यादर्शन या विषयावर व्याख्यान दिले.
कार्यक्रमावेळी गणित विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे उपस्थित होते. कै. प्रा. एस. व्ही. कानिटकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी गणित विभाग व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. आतापर्यंत डॉ. विवेक पाटकर, डॉ. माणिक टेंबे, डॉ. मेधा लिमये, डॉ. हरिहर कुंभोजकर, डॉ. मीरा माईणकर आणि डॉ. गोरोबा खुरपे यांची अनुक्रमे बहुरंगी गणित, गेम थिअरी, शुल्बसूत्रातील भूमिती, मानवी ज्ञानाचे स्वरूप, भूमिती आणि अंकगणित, मानवी जीवनातील गणिताचे स्थान आणि महत्त्व या विषयांवर व्याख्याने झाली.
या निमित्ताने पदवी आणि पदव्युत्तर विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. स्वाती अंग्रोळकर व नम्रता माने यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. बक्षीसपात्र तृतीय वर्ष गणित विषयाच्या शिवान कीर, पलाशा सामंत आणि कावेरी जंगम यांनीही यश मिळवले. प्रमुख वक्त्यांची ओळख प्रा. श्रद्धा सुर्वे आणि गणित विभाग प्रमुख डॉ. दिवाकर करवंजे यांनी तर प्रा. गौरी पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्पृहा जोशी यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

