लोटे परिसरातील १५ शाळा होणार ''डिजिटल''
- rat२७p३.jpg-
P२६O२७५०२
लोटे ः परिसरातील शाळांच्या प्रमुखांना घरडा कंपनीच्या प्रतिनिधींनी डिजिटल फलकाचे वितरण केल्याचे पत्र सुपूर्द केले.
-----
लोटेतील १५ शाळा होणार ‘डिजिटल’
घरडा कंपनीचा पुढाकार; २० फलकांचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या उद्देशाने ‘घरडा केमिकल्स लिमिटेड’ने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत परिसरातील १५ शाळांना २० डिजिटल फलकाचे (इंटरअॅक्टिव बोर्ड) वाटप केले आहे. या उपक्रमामुळे लोटे परिसरातील शाळांच्या अध्यापन प्रक्रियेत मोठी क्रांती होणार आहे.
डिजिटल फलकामध्ये ‘होम रिवाइज’ या शैक्षणिक कंपनीने विकसित केलेला १ली ते १०वीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम प्रीलोड करण्यात आला आहे. यामध्ये विषयानुसार अॅनिमेशन, शैक्षणिक व्हिडिओ, सराव प्रश्नसंच आणि पुनरावृत्ती चाचण्यांचा समावेश आहे. यामुळे क्लिष्ट विषय समजून घेणे विद्यार्थ्यांना सोपे आणि रंजक होणार आहे. केवळ साहित्याचे वाटप करून न थांबता, शिक्षकांसाठी घरडा कंपनीत विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या नियोजनासाठी घरडा कंपनीचे उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी आणि सीएसआर व्यवस्थापक बापूराव पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

