अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे गरजेचे

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे गरजेचे

Published on

- rat२७p५.jpg-
२६O२७५०४
रत्नागिरी ः राष्ट्रीय विज्ञानदिन कार्यक्रमावेळी आयोजित विशेष प्रदर्शनातील माहिती फलकाची पाहणी करताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, उपकेंद्राचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपकुलसचिव अभिनंदन बोरगावे, डॉ. पी. वाय. पाटील, डॉ. नागलगाव आणि कांदळवन कक्षाचे वैभव बोंबले आदी.
-----
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज
प्रशांत सातपुते ः रत्नागिरी उपकेंद्रात विज्ञान दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : नवा शोध घेताना अनुभवातून घेतलेला जुना बोधही तितकाच महत्त्वाचा असतो. मानवी जीवनाच्या जन्मापासून ते अंतापर्यंत विज्ञान सामावलेले आहे. समाजात पसरलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रत्येकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
मुंबई विद्यापिठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात राष्ट्रीय विज्ञानदिनाच्या औचित्याने डॉ. रोहित नागलगाव लिखित ‘इंद्रायणी महासीर ः ए कॉन्झर्वेशन जर्नी’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. या वेळी उपकेंद्राचे संचालक डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपकुलसचिव अभिनंदन बोरगावे, डॉ. पी. वाय. पाटील, डॉ. नागलगाव आणि कांदळवन कक्षाचे वैभव बोंबले उपस्थित होते. या प्रसंगी प्रशांत सातपुते म्हणाले, सर सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमण प्रभाव’ जगासमोर मांडला, ज्यासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. विज्ञानाने आपले जीवन सुखकर केले आहे. आपल्या मनात ‘का?’ आणि ‘कसे?’ हे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, संशोधन क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञानाची भीती न बाळगता संशोधनाकडे वळले पाहिजे.
या प्रसंगी पर्यावरणाची माहिती देणाऱ्या एका विशेष प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. डॉ. नागलगाव यांनी आपल्या पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. सहायक प्राध्यापिका ऋजुदा जाधव यांनी सूत्रसंचालन केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com