वार्धक्यातील विस्मरण, अल्झायमरवर वेळीच उपाय गरजेचे

वार्धक्यातील विस्मरण, अल्झायमरवर वेळीच उपाय गरजेचे

Published on

‘अल्झायमर’वर वेळेत उपाय गरजेचे
डॉ. यश वेलणकर ः लोकमान्य वाचनालयात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः विस्मरण हे मानवी जीवनासाठी आवश्यक असले, तरी वार्धक्यातील विस्मरण आणि अल्झायमर यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. अल्झायमरसारखा आजार प्राथमिक अवस्थेत ओळखल्यास योग्य उपचार, आहार आणि जीवनशैलीतील बदलांनी त्यावर नियंत्रण मिळवता येते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ (सायकोथेरपिस्ट) व समुपदेशक डॉ. यश वेलणकर यांनी केले.
येथील श्री सद्‍गुरू लोकमान्य वाचनालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वार्धक्यातील विस्मरण, विविध कारणे आणि प्रतिबंध या विषयावर व्याख्यानावेळी ते बोलत होते. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. जी. के. जोशी यांनी डॉ. यश वेलणकर यांचे स्वागत व सत्कार केला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष केशव नार्वेकर व प्रकाश घस्ते यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. प्रा. जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचनालयाच्या उपक्रमांची माहिती दिली व डॉ. वेलणकर यांनी निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सूत्रसंचालन केले.
----
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com