सफाई कामगार वारसाहक्क
नोकरीप्रश्नी टाळाटाळ नको

सफाई कामगार वारसाहक्क नोकरीप्रश्नी टाळाटाळ नको

Published on

27507

सफाई कामगार वारसाहक्क,
नोकरीप्रश्नी टाळाटाळ नको

आयुक्तांचांकडून कारवाईचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील सफाई कामगारांच्या वारसाहक्काने नोकरी मिळण्याच्या प्रलंबित प्रश्नावर आज माजी मंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. या भेटीनंतर, शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यास विनाकारण टाळाटाळ करणाऱ्या संबंधित आस्थापना प्रमुखांवर उचित कारवाई करण्याचे आदेश आयुक्त कृष्णा यांनी दिले.
या बैठकीत श्री. भोसले यांच्यासह रवींद्र भोसले, कामगार नेते संतोष पवार यांनी सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी मिळण्यात येणाऱ्या अडचणी आयुक्तांसमोर मांडल्या. यावेळी उपायुक्त रमाकांत गोसावी, मनोहर पाटील यांच्यासह सुनील परब, गोपाळ सावंत, नितीन कदम आणि सफाई कामगारांचे वारस उपस्थित होते. ​सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यासंदर्भात स्पष्ट शासन निर्णय असतानाही, अनेक ठिकाणी नियमांचे गांभीर्याने पालन न करता प्रक्रियेत दिरंगाई केली जात असल्याचे निदर्शनास आले. याची दखल घेत आयुक्त कृष्णा यांनी अशा सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. ​आयुक्तांच्या सकारात्मक भूमिकेमुळे राज्यातील हजारो सफाई कामगार कुटुंबांना न्याय मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल माजी मंत्री भोसले यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com