केळूस येथील विद्यामंदिरच्या चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
27537
केळूस येथील विद्यामंदिरच्या
चार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २७ ः ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत स. का. पाटील विद्यामंदिर केळूसमधील गुणवंत, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या शिष्यवृत्ती अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यास ३ हजार ६०० रुपये एवढी आर्थिक मदत देण्यात आली.
या शिष्यवृत्तीचे लाभार्थी हर्ष केळुसकर, भिकाजी राऊळ, दशरथ सर्वेकर, आर्या गावडे हे आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून त्यांचे शिक्षणातील सातत्य टिकविण्यासाठी हातभार लागला आहे. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश खोत यांनी ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रेरणा देणारी ज्ञानज्योती आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले, अशा भावना व्यक्त करत संस्था, पालक व शिक्षकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ग्लोबल फाउंडेशनच्या समाजोपयोगी उपक्रमांसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

