शिवपुतळा स्थलांतराबाबत वाद
O27532
झाराप : येथील बैठकीत मार्गदर्शन करताना अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत. सोबत इतर.
शिवपुतळा स्थलांतराबाबत वाद
झारापमधील प्रकार; दोन मार्चपासून उपोषणाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ : महामार्गालगत असलेल्या झाराप येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा सन्मान राखण्यासाठी २ मार्चपासून शिवप्रेमी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ॲड. सुहास सावंत यांनी बैठकीत दिला. प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नसल्याबद्दल यावेळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा महासंघ आणि शिवप्रेमींनी सावित्री लीला मंगल कार्यालय, साळगाव येथे बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
शिवरायांच्या पुतळ्याचे योग्य ठिकाणी स्थलांतर करून पूर्णाकृती स्मारक केले जात नाही, तोपर्यंत जुन्या पुतळ्याला हात लावणार नाही, असे लेखी आश्वासन प्रशासनातर्फे अधिकाऱ्यांनी दिले होते; मात्र पूर्वीपासून असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे विधिवत विसर्जन करण्याआधीच महावितरणच्या उच्च दाब डीपी असलेल्या धोकादायक ठिकाणी अयोग्य आणि बेकायदेशीरपणे आणून ठेवला. रात्रीच्या वेळी हा प्रकार करण्यात आला. त्या ठिकाणी बाजूबाजूलाच दोन पुतळे झाले. ही शिवप्रेमींची क्रूर चेष्टा आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असल्याच्या भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी विनय गायकवाड, रुपेश बिडये, अनुप नाईक, आरटीआय कार्यकर्ते मनोहर येरम, संतोष परब, वैभव जाधव, प्रसाद दळवी, समीर पालव, संदीप सावंत, भिकाजी बागवे, वसंत गायकवाड, सूरज घाटकर, वैभव पवार, अमेय धुरी, एकनाथ धुरी, उमेश धुरी, महेश वारंग, विजय नाईक-सरमळकर, मिलिंद नाईक, ओंकार घाटकर, किरण म्हापदी, लक्ष्य शितप आदी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.
---------
पुढील रणनीती ठरवणार!
पुढील रणनीतीबाबत चर्चा करून सर्व निर्णय घेण्याचे अधिकार ॲड. सावंत यांच्याकडे देण्यात आले. सावंत यांनी पुढील लढ्याविषयी मार्गदर्शन करताना, २ मार्चपासून जुन्या शिवस्मारकाच्या ठिकाणी जोपर्यंत हा विषय कायमस्वरुपी मार्गी लागत नाही, तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यासंदर्भातले पत्र स्थानिक प्रशासन आणि पोलिस यांना देण्याचे ठरले. आंदोलनाचे नियोजन करण्यासंदर्भात दशक्रोशीत गाववार नियोजन बैठका घेणार असल्याचे ॲड. सावंत यांनी जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

