माणगाव विद्यालय समूह गायनात प्रथम

माणगाव विद्यालय समूह गायनात प्रथम

Published on

27509
आजगाव : येथे समूह गीत गायन स्पर्धेचे उद्‍घाटन करताना सरपंच यशस्वी सौदागर. बाजूला अपर्णा सातोसकर, विद्यानंद मठकर व इतर.


समूह गायनात माणगाव विद्यालय प्रथम

आजगावातील स्पर्धा; शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २७ : आजगाव विद्या विहार येथे लोककल्याण शिक्षण संस्था संचलित, विद्या विहार इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य रा. गो. सामंत यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव या शाळेने प्रथम क्रमांक मिळविला.
आजगाव सरपंच यशश्री सौदागर, जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर, मुख्याध्यापक उत्तम भागीत, विलासानंद मठकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. (कै.) गुरुवर्य सामंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व्यासपीठावर संतोष वैज, स्नेहा मुळीक, दिव्या काळोजी, राजेश वैज, ममता प्रभू, पुरुषोत्तम शेणई, दत्तगुरू कांबळी, अमृतराव माळगे, तानाजी साळसकर, आत्माराम बागायतकर, शशिकांत मुळीक आदी मान्यवर होते. सरपंच सौदागर व जिल्हा परिषद सदस्या सातोसकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. मनोगतात त्यांनी प्रशालेच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला.
-----
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा
श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय (माणगाव), शिवाजी इंग्लिश स्कूल (पणदूर), नेमळे हायस्कूल (नेमळे), उत्तेजनार्थ स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल (सावंतवाडी), प्राथमिक शाळा तिरोडा क्रमांक १. स्पर्धेचे परीक्षण राजेश वैज व ममता प्रभू यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी, सूत्रसंचालन काव्या साळवी यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com